
कोल्हापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंच येथे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी न्यायमूर्ती राजेश पाटील,शैलेश ब्रह्मे,अभय मंत्री, नीरज धोटे व अश्विन भोबे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी न्या. श्रीमती देशमुख यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश,वरिष्ठ न्यायिक अधिकारी, सरकारी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ते, वरिष्ठ अधिवक्ते, बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar