सर्जियो गोरांच्या वक्तव्यावर पाकिस्तानचा तिळपापड
- अमेरिकन अधिकाऱ्यांना बोलवून व्यक्त केला निषेध इस्लामाबाद, 20 ऑगस्ट (हिं.स.)।काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि अमेरिकेतील राजनैतिक वाद बुधवारी आणखी तीव्र झाला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबादमधील अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना
सर्जियो गोरांच्या वक्तव्यावर पाकिस्तान संतप्त;अमेरिकन अधिकाऱ्यांना बोलवून व्यक्त केला निषेध


- अमेरिकन अधिकाऱ्यांना बोलवून व्यक्त केला निषेध

इस्लामाबाद, 20 ऑगस्ट (हिं.स.)।काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि अमेरिकेतील राजनैतिक वाद बुधवारी आणखी तीव्र झाला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबादमधील अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी जम्मू-काश्मीरच्या स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

पाकिस्तानने अमेरिकेच्या राजदूतांचे वक्तव्य तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले की, जम्मू-काश्मीरला ‘भारताचा भाग’ म्हटल्याचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो आणि हे वक्तव्य स्पष्टपणे फेटाळून लावतो.

पाकिस्तानने दावा केला की, जम्मू-काश्मीर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त वादग्रस्त प्रदेश आहे. या प्रश्नाचा अंतिम निर्णय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार झाला पाहिजे, असे पाकिस्तानने म्हटले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्जियो गोर यांचे वक्तव्य “बेजबाबदार” असल्याचे म्हटले. तसेच, जम्मू-काश्मीरच्या वादाबाबत अमेरिकेच्या दीर्घकाळापासूनच्या भूमिकेशी हे वक्तव्य विसंगत असल्याचा दावा केला. पाकिस्तानने अमेरिकेला बजावले की, जम्मू-काश्मीरचा वादग्रस्त दर्जा लक्षात घेऊन अमेरिकेने या मुद्द्यावर सार्वजनिक वक्तव्ये करावीत.यावेळी पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची दिलेली ऑफरही नमूद केली.

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. 2019 मध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तानची इच्छा असल्यास या मुद्द्यावर दोन्ही देशांना मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, भारताने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. त्यावेळी ट्रम्प यांनी या विषयावर निर्णय घेणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून असल्याचे म्हटले होते.

2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुन्हा उल्लेख केला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम घडवून आणण्यात भूमिका बजावल्यानंतर ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरही दोन्ही देशांसोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या काश्मीर वादावर तोडगा शोधण्यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबत मिळून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande