अमरावती विभागातील सर्व तालुक्यांत ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक कार्यक्रम
संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त एकाच वेळी आयोजन; नागरिकांना विनामूल्य प्रवेश अमरावती, २४ ऑगस्ट : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संच
ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर


संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त एकाच वेळी आयोजन; नागरिकांना विनामूल्य प्रवेश

अमरावती, २४ ऑगस्ट : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने अमरावती महसूल विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अमरावती विभागातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला.संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक साहित्यनिर्मिती, अध्यात्मिक विचार आणि समाजप्रबोधनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनावर अमीट ठसा उमटविला. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. त्यांचे समतावादी, मानवतावादी आणि भक्तिमार्गाचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकार्याचा, अध्यात्मिक विचारांचा आणि संतपरंपरेतील योगदानाचा परिचय जनसामान्यांना करून देण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, संतविचार, भक्तीपरंपरा तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन रसिकांना घडविण्यात आले.

संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत

संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, संतांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची व्यापक ओळख निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

अमरावती महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी कार्यक्रम आयोजित करून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि संतपरंपरेचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश होता. अमरावती विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande