यशस्वी जयस्वालने आशिथा फर्नांडोसोबतच्या वादावर मौन सोडले
कोलंबो, 24 ऑगस्ट (हिं.स.)कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल श्रीलंकेचा गोलंदाज आशिथा फर्नांडोसोबत वादात अडकला. या वादामुळे यशस्वी चर्चेत आला असून त्याच्या वागणुकीबद्दल त्या
यशस्वी जयस्वालने आशिथा फर्नांडोसोबतच्या वादावर मौन सोडले


कोलंबो, 24 ऑगस्ट (हिं.स.)कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल श्रीलंकेचा गोलंदाज आशिथा फर्नांडोसोबत वादात अडकला. या वादामुळे यशस्वी चर्चेत आला असून त्याच्या वागणुकीबद्दल त्याच्यावर टीका होत आहे. आता, यशस्वीने आपले मौन सोडले आहे.

यशस्वीने फर्नांडोच्या एकाच षटकात तीन चौकार मारले आणि त्यानंतर तो त्रिफळाचीत झाला. यशस्वी पॅव्हेलियनकडे परतत असताना, फर्नांडोने त्याला काहीतरी म्हटले. यशस्वीला राग आला आणि त्याने फर्नांडोला जाब विचारला, ज्यामुळे दोघांमध्ये थोडी झटापट झाली. या वागणुकीमुळे त्याच्यावर टीका होत आहे.

एका वेबसाइटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, यशस्वीने मर्यादा ओलांडली का? अशी पोस्ट टाकली. हे वाचल्यानंतर यशस्वीला प्रचंड राग आला आणि तो स्वतःला आवरू शकला नाही. या पोस्टला प्रतिसाद देताना त्याने लिहिले, त्याने काय म्हटले हे तुम्हाला माहीत नसेल, तर कृपया त्याला दोष देऊ नका. जर कोणी मर्यादा ओलांडली, तर आम्हाला हे सांगितले पाहिजे की हा भारत आहे, जो लढेल आणि प्रत्युत्तर देईल.

या डावात यशस्वीचे अर्धशतक हुकले. त्याने ४५ धावा केल्या. या वादावादीदरम्यान, काही श्रीलंकन क्रिकेटपटूंनी दोघांना वेगळे करून प्रकरण मिटवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक, सितांशु कोटक यांनी कबूल केले की, वादावादीदरम्यान यशस्वीने गोलंदाजाच्या इतके जवळ जायला नको होते. समालोचन करत असलेल्या भारताचा माजी फलंदाज अजय जडेजा याने पहिल्या कसोटी सामन्याचा संदर्भ देत म्हटले, जर तुम्हाला ते सहन होत नसेल, तर तुम्ही स्वतः ते करू नका. मागील सामन्यात निरोशन डिकवेलाविषयी यशस्वीने केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर जडेजाने ही प्रतिक्रिया दिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande