रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य शिबिर
रत्नागिरी, 26 ऑगस्ट (हिं.स.) । येथील श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा टिळक आळी गणेशोत्सवाचे १०१वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने नंदादीप आय हॉस्पिटलच्या स
रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य शिबिर


रत्नागिरी, 26 ऑगस्ट (हिं.स.) । येथील श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा टिळक आळी गणेशोत्सवाचे १०१वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच डोळे तपासणी, रक्त तपासणी (सी.बी.सी. / शुगर रँडम / क्रिएटीन / युरीक लॅसिड / पल्मोनरी फंक्शन टेस्ट), हाडांची तपासणी (बोन डेन्सिटी टेस्ट) होणार आहे.

हे शिबिर ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता टिळक स्मारक, उत्सव मंडपाशेजारी, टिळक आळी, रत्नागिरी येथे होणार असून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande