खा. बजरंग सोनवणे यांनी ससून रुग्णालयात घेतली संध्या गायकवाड यांची भेट
बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे उपचारासाठी दाखल असलेल्या पीडित महिला सौ. संध्या सूरज गायकवाड यांची खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. संध्या गायकवाड यांच्या ग
बजरंग सोनवणे


बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे उपचारासाठी दाखल असलेल्या पीडित महिला सौ. संध्या सूरज गायकवाड यांची खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.

संध्या गायकवाड यांच्या गंभीर प्रकृतीची दखल घेत खासदार सोनवणे यांनी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून त्यांच्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली. पीडित महिला ही बीड जिल्ह्याची लेक आहे, त्यामुळे तिच्या उपचारांत कोणतीही कमतरता भासू देऊ नका. तिची योग्य ती काळजी घेऊन उत्तम वैद्यकीय उपचार पुरवावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या.

संकटाच्या काळात आणि अडचणीच्या प्रसंगी सर्वसामान्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणाऱ्या खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande