कर्जत-बदलापूर मार्ग धोक्यात? डिकसळमध्ये साईडपट्टीचे बेकायदा खोदकाम?
रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत-बदलापूर मार्गावरील डिकसळ परिसरात रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या अगदी कडेला खोदकाम सुरू असताना त्यासाठी आवश
Is the Karjat-Badlapur road at risk? Illegal excavation of the road shoulder at Diksal?


साग


रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत-बदलापूर मार्गावरील डिकसळ परिसरात रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या अगदी कडेला खोदकाम सुरू असताना त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

डिकसळ येथे रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या खोदकामामुळे साईडपट्टीची रचना आणि मजबुती प्रभावित होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात खोदकाम केलेला भाग खचल्यास रस्त्याच्या कडेला माती वाहून जाण्याबरोबरच वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या कामाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

या कामासाठी संबंधित ठेकेदाराला नेमकी कोणत्या शासकीय विभागाने परवानगी दिली आहे, परवानगी देताना कोणत्या अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत आणि खोदकामासाठी अधिकृत आदेश अथवा मंजुरी आहे का, याची माहिती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

परवानगीची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून रस्त्याच्या हद्दीत किंवा साईडपट्टीवर खोदकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून परवानगीची कागदपत्रे तपासावीत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या खोदकामामुळे रस्त्याची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच भविष्यातील रस्ते दुरुस्तीवर होणाऱ्या परिणामाबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी. परवानगी असेल तर ती कोणत्या अटींवर देण्यात आली आणि नसेल तर खोदकाम सुरूच कसे झाले, याचा खुलासा होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande