परभणीच्या विकासासाठी ‘संवाद बैठकी’त मान्यवर मांडणार प्रश्न
परभणी, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी विशेष ‘संवाद बैठकी’चे आयोजन करण्यात आले आहे. अक्षदा मंगल कार्यालय येथे द
परभणीच्या विकासासाठी ‘संवाद बैठकी’त मान्यवर मांडणार प्रश्न


परभणी, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी विशेष ‘संवाद बैठकी’चे आयोजन करण्यात आले आहे. अक्षदा मंगल कार्यालय येथे दुपारी ४ वाजता ही बैठक होणार आहे.

या संवाद बैठकीस जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षक, इंजिनिअर, पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी परभणी जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न, समस्या आणि प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना व प्रश्न थेट विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वासमोर मांडावेत, या उद्देशाने या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना, समस्या व विकासाच्या संकल्पना मांडाव्यात, असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे. या बैठकीतून परभणी जिल्ह्याच्या आगामी विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande