
कोल्हापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन 'स्मॅक'चे उपाध्यक्ष भरत परशुराम जाधव यांची महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA), मुंबईच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली.
शिरोलीच्या औद्योगिक भूमीतून उभा राहिलेला 'स्मॅक'चा उद्योगविश्वातील प्रभाव आता महाराष्ट्राच्या व्यापक औद्योगिक व्यासपीठावर अधिक ठळकपणे उमटणार आहे.
ही केवळ एका पदाची निवड नाही, शिरोलीच्या उद्योगविश्वाला महाराष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेच्या व्यासपीठावर मिळालेली नवी ताकद आहे.
या निवडीबद्दलचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन भरत जाधव यांचे अभिनंदन करताना कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे. यावेळी कोल्हापूर चेंबरचे संचालक दीपक जाधव, महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. प्रशांत शिंदे व धनंजय दुग्गे उपस्थित होते.
स्मॅकचे संचालक राजू पाटील यांची यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र विभागीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या विविध स्तरांवर 'स्मॅक'चा वाढता सहभाग आणि प्रतिनिधित्व ही कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरत आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीसाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिरोलीतून सुरू झालेला उद्योगाचा प्रवास आता महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणांच्या व्यासपीठापर्यंत पोहोचत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar