मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या भक्ती संगमाचे उद्घाटन
नाशिक, 27 ऑगस्ट (हिं.स.)। : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, दि. २८ रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामे आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कावनई
Chief Minister Devendra Fadnavis


नाशिक, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, दि. २८ रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामे आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कावनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या उपकेंद्राचे उद्घाटन होणार आहे. तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या तुळजा सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळाही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कावनई येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन दुपारी २ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होईल. त्यापूर्वी सकाळी ११ वाजता कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजता ठक्करडोम येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाचे सायं. ४.३० वाजता उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमांना पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह महापौर हिमगौरी आडके तसेच नाशिक शहर , जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कार्यक्रमस्थळी आवश्यक तयारी आणि नियोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande