चंदनझिरा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या भव्य इमारतीचे भूमिपूजन संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑगस्ट (हिं.स.)। जालना शहरातील चंदनझिरा एमआयडीसी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येणाऱ्या चंदनझिरा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या भव्य नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Q


छत्रपती संभाजीनगर, 28 ऑगस्ट (हिं.स.)। जालना शहरातील चंदनझिरा एमआयडीसी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येणाऱ्या चंदनझिरा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या भव्य नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा भूमिपूजन सोहळा शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या नवीन इमारतीमुळे चंदनझिरा एमआयडीसी परिसरासह लगतच्या भागातील नागरिकांना पोलिस सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला अधिक सक्षम पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आधुनिक व सुसज्ज पोलिस ठाण्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच विविध प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.

यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

चंदनझिरा एमआयडीसी परिसराचा वाढता विस्तार तसेच औद्योगिक आणि नागरी भागातील वाढती वर्दळ लक्षात घेता, स्वतंत्र व सुसज्ज पोलिस ठाण्याची इमारत उभारणे ही महत्त्वाची गरज होती. नवीन इमारतीच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान होऊन नागरिकांना सुरक्षिततेची अधिक सक्षम व्यवस्था उपलब्ध होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या भूमिपूजन सोहळ्यामुळे चंदनझिरा एमआयडीसी परिसराच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, भविष्यात ही नवीन पोलिस ठाण्याची इमारत परिसरातील नागरिकांसाठी आधुनिक आणि सक्षम पोलिस सेवांचे केंद्र ठरणार आहे.

तसेच जालना शहरातील वाढत्या गुंड टोळ्या आणि तरुण पिढीमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या प्रमाणावर प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जालना पोलिस प्रशासनाने अधिक सक्षमपणे मोर्चेबांधणी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या व्यवहारांविरोधात ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

तरुण पिढीमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी. तसेच शहरात गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींना खाकीचा वचक दाखवून कायद्याचे राज्य अधिक मजबूत करावे , असे आवाहनही आमदार खोतकर यांनी यावेळी केले.

जालना शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सदर बाजार पोलिस स्टेशन, तालुका पोलिस स्टेशन आणि कदीम जालना पोलिस स्टेशन या सर्व पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारतींसाठी जागेसह प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे आश्वासन दिले.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असेही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

या वेळी आमदार नारायण कुचे, श्री तेघवीर सिंह संधू (भा.पो.से.), शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख भास्कर आंबेकर, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, श्री विक्रम साळी (भा.पो.से.), श्री अनंत कुलकर्णी (भा.पो.से.), पोलिस निरीक्षक किरण बिडवे, घनश्याम गोयल, संतोष मोहिते, बाळासाहेब पवार, कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेविका संध्या देठे, नगरसेविका रिमा खरात, अजित छाबडा, पांडुरंग डोंगरे, अर्जुन गेही, गणेश सुपारकर, रितेश पंचारिया, संतोष रासवे, अंबादास चितेकर, आनंद धोत्रे, दिनेश दैने, सुनील बोर्डे, बाला परदेसी, मुज्जू खान, राम सतकर, अरुण अग्रवाल, धीरेन मेहरा, सतीश गोयल, गोपाल मानधना, डी. बी. सोनी, नंदू जांगडे, दीपक भुरेवाल, महेंद्र भक्कड, दत्ता काकडे, सुनील आदमाने, राधाकिसन दाभाडे, शांतीलाल राऊत यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, परिसरातील व्यापारी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande