ग्रामीण विकासाला निधीचे बळ; रस्ते-पाणी योजनांना दीर्घकालीन ‘संजीवनी’
* NaBFID आणि NABARD यांचाfrff सामंजस्य करार मुंबई, २८ ऑगस्ट (हिं.स.) : गावोगावी रस्ते, पूल, पाणीपुरवठा, स्वच्छता, सिंचन आणि इतर महत्त्वाच्या ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांना आता दीर्घकालीन वित्तपुरवठ्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे. नॅशनल बँक फॉर
MoU


* NaBFID आणि NABARD यांचाfrff सामंजस्य करार

मुंबई, २८ ऑगस्ट (हिं.स.) : गावोगावी रस्ते, पूल, पाणीपुरवठा, स्वच्छता, सिंचन आणि इतर महत्त्वाच्या ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांना आता दीर्घकालीन वित्तपुरवठ्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) आणि नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) यांनी ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी संयुक्तपणे वित्तपुरवठ्याच्या संधी निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

या भागीदारीमुळे ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल, पाणी व स्वच्छता व्यवस्था, सिंचन, कापणीनंतरच्या साठवणुकीच्या सुविधा, कोल्ड-चेन, टर्मिनल मार्केट्स, वेअरहाऊसिंग आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

NABARD ची ग्रामीण भागातील व्यापक उपस्थिती आणि NaBFID ची पायाभूत सुविधा क्षेत्रातील वित्तपुरवठ्याची क्षमता यांचा एकत्रित वापर या सहकार्यात केला जाणार आहे. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर राबवता येऊ शकणाऱ्या प्रकल्पांसाठी वित्तपुरवठ्याचे उपाय विकसित करण्यावर भर असेल. यासाठी को-लेंडिंग आणि कन्सोर्टियम लेंडिंगसारख्या पर्यायांचा वापर करून दीर्घकालीन वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याची शक्यता दोन्ही संस्था तपासणार आहेत.

या सहकार्यामध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) प्रकल्प आणि कृषी मूल्यसाखळीशी संबंधित उपक्रमांचाही समावेश असेल. केवळ कर्ज पुरवठ्यापुरते हे सहकार्य मर्यादित राहणार नसून, प्रकल्पांची रचना, आर्थिक मॉडेल तयार करणे, विविध वित्तसंस्थांना कर्जासाठी एकत्र आणणे यासंदर्भातील सल्लागार सेवाही दिली जाणार आहे. दोन्ही संस्थांच्या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून संयुक्त प्रशिक्षण आणि कौशल्य dविकास उपक्रमही राबवले जाणार आहेत.

NABARD चे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. यांनी या भागीदारीमुळे ग्रामीण आणि शहरी भागांमधील दरी कमी करण्यास तसेच ग्रामीण विकासाला चालना देण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये सामाजिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाजू असून, आर्थिकदृष्ट्या टिकाऊ आणि बाजारपेठेवर आधारित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

NaBFID चे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय जी. यांनी सांगितले की, ग्रामीण विकासाच्या गरजांबाबत NABARD ची सखोल समज आणि NaBFID ची पायाभूत सुविधा वित्तपुरवठ्याची क्षमता यांची सांगड घालणे, हे ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण क्षेत्रात दीर्घकालीन भांडवलाचा अधिक प्रवाह वाढविणे, हा या भागीदारीचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

NaBFID च्या उपव्यवस्थापकीय संचालक आणि CFO मोनिका कालिया यांनी सांगितले की, NABARD सोबत को-लेंडिंग आणि कन्सोर्टियम लेंडिंगच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी आवश्यक वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर असेल. त्याचबरोबर सल्लागार सेवा आणि कौशल्यविकास उपक्रमांमुळे ग्रामीण प्रकल्पांची तयारी आणि अंमलबजावणीही अधिक सक्षम होईल.

एकंदरीत, ग्रामीण भारतातील पायाभूत सुविधांच्या दीर्घकालीन विकासासाठी निधीची उपलब्धता वाढविणारा हा करार ठरू शकतो. विशेषतः गावोगावी रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन आणि साठवणूक सुविधांसारख्या मूलभूत योजनांना या भागीदारीतून आर्थिक संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande