
नांदेड, 28 ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. राजकीय नेत्यांनीही आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
नांदेड जिल्ह्याचे भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रक्षाबंधनानिमित्त आपल्या दोन्ही मुलींकडून राखी बांधून घेतली. यावेळी त्यांनी बहिणींसोबतच्या भावनिक नात्याच्या आठवणींना उजाळा दिला.
अशोक चव्हाण म्हणाले, “रक्षाबंधनासाठी प्रत्यक्ष भेटणे शक्य झाले नाही, तरी माझ्या सर्व बहिणी दरवर्षी आवर्जून राख्या पाठवतात. त्या राख्यांमध्ये त्यांच्या प्रेमाची, मायेची आणि आशीर्वादाची ऊब असते. रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही मुलींच्या हातून या राख्या बांधून घेताना बहिणींच्या प्रेमाची ही अनमोल आठवण मनाला स्पर्शून जाते.”
रक्षाबंधनाच्या निमित्ताने चव्हाण यांनी बहिणी आणि मुलींसोबतचा हा आनंदाचा क्षण सोशल मीडियावरही शेअर केला. त्यांच्या या भावनिक संदेशाला नागरिकांकडून शुभेच्छा आणि प्रतिसाद मिळत आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis