
लातूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
भारत देश हा कृषिप्रधान देश व शेतर्कयाला जगाचा पोशिंदा मनल जात पण याच शेतर्कयांना आपली शेती कसत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो कधी अल्प पाउस तर कधी अतिवृष्ठी सारख्या संकटाशी सामोरे जात शेती पीकवावी लागते यावर्षी पाउस नसल्याने व महागाई वाढल्याने शेतकरी हवालदील - झाल्याच चिञ आहे.
पावसाने दडी मारल्याने औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामध्ये औसा तालुक्यातील पारधेवाडी गावातील शाम भिमराव साखरे व बालाजी रावसाहेब शिंदे शेतकऱ्याचा पावसाअभावी पाच एकर क्षेत्रातील ऊस पीक पूर्णपणे वाळून
गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने शेतकऱ्याने ऊस पिकासाठी मोठा खर्च केला होता. मात्र, पावसाने पाठ
फिरवल्याने आणि पाण्याअभावी ऊस पिकाची वाढ खुंटली असुन अखेर पिकाला पुरेसे पाणी न मिळाल्याने संपूर्ण पाच एकर ऊस वाळून गेला.
वर्षभर मेहनत, वाढता उत्पादन खर्च आणि पिकाची झालेली वाताहत यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा आणि संबंधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
पारधेवाडी तील शेतकऱ्यांनी उस हृपिकासाठी कष्ट घेतले, पण पावसाअभावी डोळ्यांसमोर उभे पीक वाळून गेले; आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.
तरी सरकारने याकडे गांभिर्याने पहावे व आमच्या बांधावर येउन पंचनामा करुन आम्हाला अर्थीक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis