अर्जेंटिनाने भारतीय औषध क्षेत्राच्या प्रवेशाला सुलभ करण्यासाठी दर्शवली वचनबद्धता
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट (हिं.स.)। अर्जेंटिनाने भारतीय फार्मा सेक्टरचा प्रवेश सुलभ करण्यासाठी अडथळे कमी करण्याबाबत वचनबद्धता दर्शवली आहे. या आठवड्यात वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या ब्यूनस आयर्स दौऱ्यादरम्यान या मुद्द्यावर चर्चा झाली. वाणिज्य आणि उ
Argentina committed facilitating entry Indian phar


नवी दिल्ली, 29 ऑगस्ट (हिं.स.)। अर्जेंटिनाने भारतीय फार्मा सेक्टरचा प्रवेश सुलभ करण्यासाठी अडथळे कमी करण्याबाबत वचनबद्धता दर्शवली आहे. या आठवड्यात वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या ब्यूनस आयर्स दौऱ्यादरम्यान या मुद्द्यावर चर्चा झाली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, अर्जेंटिनाने आपल्या देशात भारतीय औषध क्षेत्राचा प्रवेश सुलभ करण्यासाठी अडथळे कमी करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे. मंत्रालयाने सांगितले की, यामुळे भारतीय औषध कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होण्याची आणि अर्जेंटिनामध्ये दर्जेदार तसेच परवडणाऱ्या आरोग्य सेवांपर्यंत पोहोच सुधारण्याची अपेक्षा आहे.

मंत्रालयाने म्हटले, ”अर्जेंटिनाने आपल्या औषध नियामक चौकटीअंतर्गत भारताला अॅनेक्स-2 मधून अॅनेक्स-1 मध्ये अपग्रेड करण्याच्या आणि बाजारपेठेतील प्रवेशातील अडथळे आणखी कमी करण्याच्या दिशेने काम करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे.” हा मुद्दा या आठवड्यात वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या ब्यूनस आयर्स दौऱ्यादरम्यान चर्चेत आला. ते भारत-अर्जेंटिना जॉइंट ट्रेड कमिटी (जेटीसी)च्या बैठकीसाठी अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर होते. ही बैठक 24 ऑगस्ट 2026 रोजी ब्यूनस आयर्स येथील पलासिओ सॅन मार्टिन येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले, तर अर्जेंटिना प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स सचिव अॅम्बेसेडर फर्नांडो ब्रून यांनी केले.

मंत्रालयाने सांगितले की, भारत आणि अर्जेंटिनामधील द्विपक्षीय व्यापार 2025 मध्ये 6.5 अब्ज अमेरिकी डॉलरच्या पुढे गेला असून, त्यात 17 टक्क्यांहून अधिक सातत्यपूर्ण वार्षिक वाढ नोंदवली गेली. यावेळी मायनिंग, एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींवरही चर्चा झाली. यावेळी भारत आणि अर्जेंटिनाने लिथियम, एनर्जी आणि अॅग्रिकल्चर क्षेत्रातील सहकार्य पुढे नेण्याबाबतही चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande