
नागपूर, 30 ऑगस्ट (हिं.स.) - मनोज जरांगे यांचे जे काही आंदोलन चालले आहे, त्या आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी त्याठिकाणी आहेत. ते चर्चा करणार आहेत, यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे आणि पुढेही आपण मार्ग काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीपासून अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहेत. ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानच्या अंतर्गत असतील, आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरिता आम्ही चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असून राज्यभरातील मराठा बांधव त्यांच्या भेटीसाठी अंतरवालीत जात आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आज नागपूरात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्याशी बोलत आहेत, सरकार जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. येत्या एक-दोन दिवसात तोडगा निघेल, असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी