
चंद्रपूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 15 लाख 27 हजार 502 मतदार आहेत. त्यामध्ये 7 लाख 80 हजार 505 पुरुष, 7 लाख 47 हजार 22 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता राजुरा मतदारसंघात 2 लाख 72 हजार 850 मतदार, चंद्रपूर मतदारसंघात 2 लाख 59 हजार 444 मतदार, बल्लारपूर मतदारसंघात 2 लाख 46 हजार 595 मतदार, ब्रम्हपुरी मतदारसंघात 2 लाख 51 हजार 129 मतदार, चिमूर मतदारसंघात 2 लाख 58 हजार 769 मतदार तर वरोरा मतदारसंघात 2 लाख 38 हजार 764 मतदारांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव