
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून राज्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे.
कालावधी : १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७
या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांचे अर्ज तसेच अर्धन्यायिक प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या संमतीने तडजोडीद्वारे कायमस्वरूपी निकाली काढणे हा आहे.
या कार्यालयांमधील प्रलंबित महसुली दावे व अपिलांचा समावेश :
▪️ मंडळ अधिकारी
▪️ नायब तहसीलदार
▪️ तहसीलदार
▪️ उपविभागीय अधिकारी
▪️ उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
▪️ अप्पर जिल्हाधिकारी
▪️ जिल्हाधिकारी
दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असून, दोन्ही पक्षकारांच्या संमतीने तडजोडनामा करून अंतिम आदेशाद्वारे प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढण्यात येतील.
अभियानाचे सविस्तर वेळापत्रक संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.
वेळ आणि पैशांची बचत करा, महसूल लोक अदालतीचा लाभ घ्या!
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis