नांदेडमध्ये मन की बातचे तृतीयपंथी भगिनी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले श्रवण !
नांदेड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी मन की बात १३७ भागाचे तृतीयपंथी भगिनी आणि भाजपा पदाधिकारी सहकाऱ्यांसोबत श्रवण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ''मन की बात'' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या
अ


नांदेड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी मन की बात १३७ भागाचे तृतीयपंथी भगिनी आणि भाजपा पदाधिकारी सहकाऱ्यांसोबत श्रवण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १३७ व्या भागाचे थेट प्रसारण तृतीयपंथी भगिनी आणि भाजप सहकाऱ्यांसोबत एकत्र ऐकण्याचा एक अत्यंत खास अनुभव राहिला.

ते म्हणाले, या भागात पंतप्रधानांनी देशातील विविध क्षेत्रांतील यशोगाथा, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील प्रगती आणि लोकसहभागातून होणाऱ्या बदलांवर दिलेला संदेश अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.

'विकसित भारत' घडवण्याच्या या प्रवासात 'मन की बात'मधून मिळणारी ही सकारात्मक ऊर्जा आम्हा सर्वांना राष्ट्रसेवा आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा देते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande