
कोट्यावधीचे नुकसान, चौकशी करा शेतकऱ्यांची मागणी
लासलगाव / मनमाड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
- करोडो रुपये खर्च करून केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा हा आता गोदामा मध्येच सोडू लागल्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले आहे मात्र दुसरीकडे ज्यावेळेस प्रत्यक्षात कांदा बाजारात येण्याची आवश्यकता होती त्यावेळेस हा कांदा येऊन न शकल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती पैसे मोजून कांद्याची खरेदी करावी लागणार आहे त्यामुळे फक्त नाफेड आणि एनसीसीएफच्या हलगर्जीपणामुळेच केंद्र सरकारचे मोठे नुकसान झाले आहे तर ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सातत्याने कांद्याचे दर पडू लागल्यानंतर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 15 मे पासून सर्वसाधारण दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता. केंद्र सरकारच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाच्या वतीने हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस कांद्याची गरज असेल त्यावेळेस ग्राहकांना स्वस्तात कांदा देता यावा, यासाठी उचललेले हे पाऊल होते परंतु नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्हीही संस्थांनी मुळात ठरवून दिलेल्या वेळेत कांदा खरेदी केली नाही ज्यावेळेस बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याचे खरेदी प्रत्यक्षात करणे गरजेचे होते त्यावेळी ती केली गेली नाही त्या उलट काही मोजक्या व्यापाऱ्यांना किंवा दलालांना हाताशी धरून कांद्याची खरेदी केली ती पण चुकीच्या पद्धतीने असल्याच्या तक्रारी शेतकरी संघटना शेतकरी काही सामाजिक संघटना या करत असताना देखील त्याकडे जिल्हा प्रशासनापासून नाफेड आणि एनसीसीएफ च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले . त्यामुळे एक तर कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफने जी केली होती ती पूर्णपणे चुकीची होती हेच समोर आलंच परंतु दुसरीकडे या सगळ्या याच्यामुळे मोठा त्रास आता सहन करावा लागत आहे.
आता कांद्याचे दर हे वाढत आहेत बाजारामध्ये सध्याच्या परिस्थितीला कांदा उपलब्ध नाहीये नवीन कांदा येण्यासाठी किमान अजून महाराष्ट्रामध्ये दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे तर देशाच्या इतर भागांमध्ये स्थानिक कांदा जो कमी दर्जाचा आहे परंतु वेळेला उपयोगातील तो निघण्यासाठी तरीही एक ते दीड महिन्याच्या कालावधी जाणार आहे त्यामुळे नाफेड एनसीसीएफने योग्य प्रतिचा खरेदी केलेला कांदा बाजारात येणे अपेक्षित होते परंतु ते आता मात्र होत नाही त्यामुळे केंद्र सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे
मागील काही दिवसापासून लासलगाव मनमाड तसेच इतर ठिकाणी केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन यंत्रणांनी जो कांदा खरेदी केला होता तो आता पूर्णपणे खराब होऊ लागलेला आहे त्यामध्ये किडे पडू लागलेले आहेत त्यातून मोठी दुर्गंधी बाहेर येत आहे त्यामुळे हा कांदा सडल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे गोदामामध्येच हा कांदा सडल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही फायदा होणार नाही आणि केंद्र सरकारचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत ते केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे हे आता समोर आले आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत असून यामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचेही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI