हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांचे पुढचे टार्गेट कुंभमेळा, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
पुणे, 31 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाच्या विचारसरणीला थेट विरोध करता येत नसल्याने आता हिंदू समाज, मंदिरे आणि धार्मिक आयोजनांबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवल
मुख्यमंत्री


पुणे, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाच्या विचारसरणीला थेट विरोध करता येत नसल्याने आता हिंदू समाज, मंदिरे आणि धार्मिक आयोजनांबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राम मंदिरातील देणगीपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्याचा संदर्भ देत, “काही प्रमाणात घोटाळा झाला हे सत्य आहे; मात्र संपूर्ण मंदिर लुटल्याचा आव आणला जात आहे,” असा दावा फडणवीसांनी केला. हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांचे पुढचे टार्गेट कुंभमेळा असल्याचेही त्यांनी म्हटले. कुंभमेळ्यातील कामांच्या निविदांचे चार टप्प्यांत ऑडिट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी ‘CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम’ अशी टीका करत या संघटनेत ‘भारत जोडो’मधील ८० संघटना सहभागी असल्याचा दावा केला.

पुण्यातील गणेशोत्सवातील DJच्या वादावरही फडणवीसांनी भाष्य केले. DJच्या मुद्द्यावर न अडकता गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राहुल गांधींवर टीका करताना फडणवीसांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधी “रोज खोटं बोलतात” असा आरोप करत, “झूट की गुंज बंद करो राहुल गांधी” असेही ते म्हणाले. तसेच २०२९ मध्ये मोदी सरकार महिला आरक्षण लागू करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande