चंद्रपूर : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान
चंद्रपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।गुजरात येथे 79 देशांच्या सहभागातून झालेल्या चॅम्पियनशिपमधील विजेत्या आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. पूजा देऊरकर, चीनमधील शांगलुओ येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2025 मधील विजेत्या सखी दोरखंडे तसेच सन 2025-26 म
चंद्रपूर : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान


चंद्रपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।गुजरात येथे 79 देशांच्या सहभागातून झालेल्या चॅम्पियनशिपमधील विजेत्या आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. पूजा देऊरकर, चीनमधील शांगलुओ येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2025 मधील विजेत्या सखी दोरखंडे तसेच सन 2025-26 मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित 100 मीटर दौड व इतर स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

30 ऑगस्ट रोजी सामूहिक क्रीडा शपथ घेण्यात आली. ‘सायकल ऑन संडे’ उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यासोबत पदयात्रा, धावणे आदी उपक्रम घेण्यात आले. रॅलीच्या मार्गावर मार्गदर्शक फलक आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते.

बल्लारशाह येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पारंपरिक लाठी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक लाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच डीम संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी, रस्सीखेच, नेटबॉल, हॉकी, खो-खो आणि बुद्धिबळ स्पर्धाही उत्साहात पार पडल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande