सपा मंगळवारपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार - अखिलेश यादव
लखनऊ, 31 ऑगस्ट (हिं.स.)।समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या पक्षाची प्रचारमोह
समाजवादी पक्ष मंगळवारपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार, अखिलेश यादव यांची घोषणा


लखनऊ, 31 ऑगस्ट (हिं.स.)।समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या पक्षाची प्रचारमोहीम उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यांनी सोमवारी समाजवादी पक्षाच्या मुख्यालयातून ही मोठी घोषणा केली.

अखिलेश यादव म्हणाले, “आमच्या पक्षाची प्रचारमोहीम उद्यापासून सुरू होत आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून, या मोहिमेची व्याप्तीही मोठी असेल.” यादव यांनी सांगितले की, “समाजवादी पक्षाला बूथ स्तरापर्यंत मजबूत करायचे असून, पीडीएचे सरकार स्थापन करायचे आहे,” असा निर्णय पक्षाने घेतला आहे.

यासोबतच अखिलेश यादव यांनी भाजपवर मतदार यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला. भाजप बाहेरील लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेत आहे, असा दावा त्यांनी केला. लखनऊ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनीयोगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पोलीस विभागातही पीडीएसोबत अन्याय केला जात आहे.

पीडीएतील लोकांना क्षेत्रीय (फिल्ड) पदांवर नियुक्त्या दिल्या जात नाहीत. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही त्यांना रजा मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande