भारतातील पहिला एडलवाईस निफ्टी REITs अँड रियल्टी इंडेक्स फंड लाँच
* नवीन फंड 19 ऑगस्टपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) - एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Edelweiss MF/EMF/EAMC) ने आज भारतातील पहिला REITs-आधारित इंडेक्स फंड एडलवाईस निफ्टी REITs अँड रियल्टी इंडेक्स फंड लाँच केल्याची घोषणा
एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट


* नवीन फंड 19 ऑगस्टपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला

मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) - एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Edelweiss MF/EMF/EAMC) ने आज भारतातील पहिला REITs-आधारित इंडेक्स फंड एडलवाईस निफ्टी REITs अँड रियल्टी इंडेक्स फंड लाँच केल्याची घोषणा केली. या न्यू फंड ऑफर (NFO) साठी 5 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत गुंतवणूक करता येईल.

ही ओपन-एंडेड इंडेक्स योजना ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून निफ्टी REITs अँड रियल्टी टोटल रिटर्न इंडेक्स (TRI) च्या परताव्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. सूचीबद्ध REITs आणि सूचीबद्ध रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ही योजना गुंतवणूकदारांना भारतातील सूचीबद्ध रिअल इस्टेट परिसंस्थेमध्ये वैविध्यपूर्ण पॅसिव्ह गुंतवणुकीची संधी देते. या इंडेक्समध्ये सध्या किमान 60% वाटा सूचीबद्ध REITs मध्ये असून उर्वरित वाटा सूचीबद्ध रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये आहे. पात्र सूचीबद्ध REITs ची संख्या वाढत गेल्यास REITs मधील वाटा 100% पर्यंत वाढवता यावा, यासाठी इंडेक्सची रचना करण्यात आली आहे.

भारतामध्ये शहरीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सकडून ग्रेड-ए व्यावसायिक मालमत्तेची वाढती मागणी तसेच उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार अशा दीर्घकालीन संरचनात्मक घटकांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळत असताना हा फंड लाँच करण्यात आला आहे. नियामक सुधारणांमुळे, वाढत्या गुंतवणूकदार सहभागामुळे आणि व्यापक बाजार निर्देशांकांमध्ये REITs चा समावेश झाल्यामुळे भारतातील सूचीबद्ध REITs बाजारातही लक्षणीय प्रगती झाली आहे.

निफ्टी REITs अँड रियल्टी टोटल रिटर्न इंडेक्स हा उत्पन्न निर्माण करणारे सूचीबद्ध REITs आणि सूचीबद्ध रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश करतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका पॅसिव्ह गुंतवणूक पर्यायाद्वारे व्यावसायिक रिअल इस्टेट मालमत्तेतील उत्पन्नाची क्षमता तसेच सूचीबद्ध रिअल इस्टेट व्यवसायांच्या वाढीच्या संधींचा लाभ घेता येतो. हा इंडेक्स पारदर्शक आणि नियमाधारित कार्यपद्धतीचे पालन करतो आणि सूचीबद्ध रिअल इस्टेट क्षेत्रातील वैविध्यपूर्ण गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी दर तिमाहीला त्याचे पुनरावलोकन केले जाते.

फंडाच्या लाँचप्रसंगी बोलताना एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता म्हणाल्या, भारतीय गुंतवणूकदारांसाठी रिअल इस्टेट हा दीर्घकाळापासून महत्त्वाचा मालमत्ता वर्ग राहिला आहे. मात्र, मोठ्या भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आणि कार्यप्रणालीतील गुंतागुंत यांमुळे त्यामध्ये प्रवेश मर्यादित राहिला. REITs मुळे नियमनबद्ध आणि पारदर्शक रचनेद्वारे उच्च दर्जाच्या उत्पन्न देणाऱ्या रिअल इस्टेट मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ झाले आहे. भारतातील पहिल्या REITs-आधारित इंडेक्स फंडाच्या माध्यमातून आम्ही कमी खर्चिक आणि सहज उपलब्ध गुंतवणूक पर्यायाद्वारे या मालमत्ता वर्गात वैविध्यपूर्ण गुंतवणूक करणे आणखी सोपे करत आहोत. हा फंड गुंतवणुकीच्या संधी वाढवेल आणि गुंतवणूकदारांना अधिक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

REITs हे व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिक सुलभ माध्यम म्हणून उदयास आले आहेत. एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या या संरचनेद्वारे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित आणि उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करता येते. थेट रिअल इस्टेट खरेदीच्या तुलनेत REITs अधिक तरलता, कमी प्रारंभिक गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन तसेच मालमत्ता, भाडेकरू आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये अधिक वैविध्य प्रदान करतात. हा फंड या सर्व वैशिष्ट्यांना म्युच्युअल फंडाच्या सोयीसह एकत्र आणतो.

या योजनेचे व्यवस्थापन श्री. भरत लाहोटी आणि सौ. मानसी जालगावकर करतील. ही योजना ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून निफ्टी REITs अँड रियल्टी टोटल रिटर्न इंडेक्स (TRI) मधील समभागांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वृद्धी साध्य करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि जोखीम प्रोफाइल लक्षात घेऊन ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही, याबाबत त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande