अकोला - तोष्णीवाल ले-आऊट येथील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई
अकोला, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। तोणीवाल ले-आऊट येथील नागरिकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये तसेच सहा.आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत आज दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या पुर्व क्षेत्रातील
Photo


अकोला, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। तोणीवाल ले-आऊट येथील नागरिकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये तसेच सहा.आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत आज दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या पुर्व क्षेत्रातील तोष्णीवाल ले-आऊट मधील अनधिकृत/अतिक्रमीत स्पोर्ट टर्फ व रेस्ट्रॉरंट वर क्षेत्रिय कार्यालय पुर्व व अतिक्रमण विभाग यांचेव्दारे निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

या कार्यवाहीत सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे प्रविण मिश्रा, राहुल राऊत, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे तसेच पुर्व झोन कार्यालयाचे आणि अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande