सर्वसामान्यांची सेवा हाच शिवसेनेचा खरा ध्यास आहे - चंद्रशेखर पांडे
अकोला, 06 ऑगस्ट (हिं.स.)। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदूर (जि. अकोला) येथे गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी ''भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरा''चे यशस्वी आय
Photo


अकोला, 06 ऑगस्ट (हिं.स.)। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदूर (जि. अकोला) येथे गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी 'भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरा'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. Rotary Club of Hanging Gardens, Mumbai व दमाणी नेत्र हॉस्पिटल, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच म.श्री सभापती शुक्लजी (डायरेक्टर, दमाणी नेत्र हॉस्पिटल) आणि तज्ज्ञ वैद्यकीय टीमच्या विशेष सहकार्याने हे शिबिर पार पडले.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी म्हणाले, सर्वसामान्यांची सेवा हाच शिवसेनेचा खरा ध्यास आहे. ग्रामीण भागातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू व नेत्रविकारांमुळे त्रास सहन करावा लागू नये, यासाठी या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. भविष्यातही अकोला जिल्ह्यात अशा विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची मालिका सुरूच राहील.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना सहसंपर्कप्रमुख अश्विनभाऊ नवले, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, माजी नगरसेवक गजानन चव्हाण महेंद्र गाढवे समन्वयक,सुरेश जाधव, आणि महिला आघाडी शुभांगी किनगे महीला आघाडी वर्षा राऊत, अर्चना राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थितांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

450 रुग्णांनी घेतला लाभ

सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिरात शेकडो ग्रामस्थ व रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गजानन खराटे, देवीदास बोदडे, रवींद्र टिकार, दीपक तायडे, संजय इंगळे, अजय चव्हाण, आकाश पवार, श्रीकांत भेंडे,विजय प्रजापती, गोपाल गावंडे भास्कर उन्हाळे, साहेबराव वानरे, प्रमोद टिकार, नयन टिकार,नियाज अली,विठ्ठल मतदे, दिनकर जानोकार, विजय वनारे, बालू डोंगरे, शेषराव महोरे, अनिल डाबेराव, नियाज अली, मुज्जमिल, संतोष टिकार, सैयद रफीक, श्रीमती रंजनाबाई इंगळे, सौ. बावनेताई यांच्यासह श्री चंद्रशेखर पाडे गुरुजी मित्र मंडळ व शिवसेना अकोला जिल्हा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अनिल मालगे यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande