गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची अंबादास दानवेेंकडून पाहणी
नांदेड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडले जाऊ नये, यासाठी सुरू असलेल्या गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची शिवसेना उबाठा गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी रिव्हर फ्रंटच्या कामाची सं
अ


नांदेड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडले जाऊ नये, यासाठी सुरू असलेल्या गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची शिवसेना उबाठा गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी रिव्हर फ्रंटच्या कामाची संपूर्ण पाहणी करून सांडपाण्याचा प्रश्न, नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती घेतली.

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणे ही अत्यंत गंभीर बाब असून, नदीमध्ये सांडपाणी सोडले जाणार नाही यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या प्रश्नासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) निर्देशांचा आणि पर्यावरणीय नियमांचा विचार करून प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी मांडली.गोदावरी नदी ही नांदेडच्या नागरिकांसाठी श्रद्धेची आणि जीवनदायी नदी आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande