राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता वेटलिफ्टर ऋषिकांत सिंग आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.)आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय वेटलिफ्टिंग संघाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता ऋषिकांत सिंग दुखापतीमुळे या खंडीय स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाले
ऋषिकांत सिंग


नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.)आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय वेटलिफ्टिंग संघाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता ऋषिकांत सिंग दुखापतीमुळे या खंडीय स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेला तो एकमेव पुरुष वेटलिफ्टर होता. मणिपूरचा रहिवासी असलेला ऋषिकांत ६० किलो वजनी गटात स्पर्धा करतो. त्याला गुडघ्याची दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.

जुलैमध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुमारे आठवडाभर आधी ऋषिकांतला गुडघ्याची दुखापत झाली होती. असे असूनही, त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि रौप्य पदक जिंकले. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, संघाला आशा होती की ऋषिकांत आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होईल, पण तसे झाले नाही. तपासणीनंतर, त्याला सुमारे एक महिना पुनर्वसन (रिहॅब) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऋषिकांतच्या बाहेर पडण्यामुळे, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय वेटलिफ्टिंग संघात आता चार महिला आहेत. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू ४९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. ज्ञानेश्वरी यादव ५३ किलो गटात, निरुपमा देवी ६१ किलो गटात आणि हरजिंदर कौर ६९ किलो गटात स्पर्धा करतील. ऋषिकांतला वगळल्यामुळे पुरुष गटातील भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आता महिला वेटलिफ्टर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande