सोलापूर : टँकर मागणीचे प्रस्ताव ४८ तासांत मंजूर करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी करणारे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना ४८ तासांच्या आत मंजुरी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम क
tankar


सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी करणारे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना ४८ तासांच्या आत मंजुरी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

संभाव्य टंचाई आराखड्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार ऑनलाइन उपस्थित होते. बैठकीत सांगोला तालुक्यातील शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे सुमारे १ कोटी ८५ लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती पाणीपुरवठा योजनेचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली. थकबाकीमुळे या योजनेचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील सादळापूर आणि आंधेवाडी खुर्द तसेच माढा तालुक्यातील उपळाई येथील प्रलंबित अडचणी संबंधित तहसीलदारांनी दोन दिवसांत सोडवाव्यात. तसेच ही कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande