सोलापूर : शाळांच्या स्लॅबसाठी अभियंत्यांची उपस्थिती बंधनकारक
सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गिलावा पडण्याच्या घटना समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शाळेचा स्लॅब टाकताना शाखा अभियंत्यांची
Zp


सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गिलावा पडण्याच्या घटना समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शाळेचा स्लॅब टाकताना शाखा अभियंत्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच स्लॅब टाकतानाचे जिओटॅग छायाचित्र उपलब्ध झाल्यानंतरच संबंधित कामाचे बिल अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची मासिक बैठक झाली. यावेळी शाळांच्या स्लॅबच्या कामावर अभियंत्यांचे थेट नियंत्रण राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. स्लॅब टाकण्याच्या वेळी संबंधित शाखा अभियंता प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, कामाची पाहणी केल्यानंतर त्याचे जिओटॅग छायाचित्र घेण्यात येणार आहे. या छायाचित्राच्या आधारेच संबंधित कामाचे बिल मंजूर करण्याची कार्यपद्धती लागू केली जाणार आहे. शाळांच्या बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शाळांमध्ये गिलावा पडण्याच्या घटना घडत असल्याने बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. बैठकीस सदस्य सचिन जाधव, बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरादी तसेच बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता अतुल लेंडवे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande