
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर (हिं.स.) । जंतर मंतरमधील निदर्शनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलांना कथितपणे मारहाण करून जखमी केल्याचा आरोप असलेल्या स्वतंत्र भारद्वाज यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ प्रताप सिंह यांनी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
न्यायालयाने १४ सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान स्वतंत्र भारद्वाज यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील उमेश शर्मा यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांना राजकीय कारणास्तव गोवण्यात आले आहे. शर्मा यांनी असा युक्तिवाद केला की, स्वतंत्र भारद्वाज यांना एससी/एसटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती, पण नंतर त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
७ सप्टेंबर रोजी, न्यायालयाने स्वतंत्र भारद्वाज यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने भारद्वाज यांना ७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. स्वतंत्र भारद्वाज यांना ४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली होती.एका पॉडकास्टमध्ये एका आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या डोक्यावर हल्ला केल्याची कबुली दिल्यानंतर स्वतंत्र भारद्वाज यांना अटक करण्यात आली. या पॉडकास्टनंतर, कॉकरोच जनता पार्टी आणि इतर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे