तारिक रहमान यांना भारताकडून दोन निमंत्रणे- रणधीर जयस्वाल
नवी दिल्ली , 15 सप्टेंबर (हिं.स.)।ब्रिक्स परिषदेदरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी सहभाग घेतला नाही. परिषद सुरू होण्यापूर्वी बांगलादेशकडून दावा करण्यात आला होता की, भारताकडून त्यांना कोणतेही निमंत्रण मिळाले नव्हते. आता या मुद्द्यावर भा
तारिक रहमान यांना भारताकडून दोन निमंत्रणे- रणधीर जयस्वाल


नवी दिल्ली , 15 सप्टेंबर (हिं.स.)।ब्रिक्स परिषदेदरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी सहभाग घेतला नाही. परिषद सुरू होण्यापूर्वी बांगलादेशकडून दावा करण्यात आला होता की, भारताकडून त्यांना कोणतेही निमंत्रण मिळाले नव्हते. आता या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याच्या प्रश्नावर रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताने त्यांना द्विपक्षीय भेटीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर बिमस्टेकचे अध्यक्ष या नात्याने त्यांना ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठीही निमंत्रण देण्यात आले होते.यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारताकडून दोन वेगवेगळी निमंत्रणे मिळाली होती. पहिले निमंत्रण द्विपक्षीय भेटीसाठी, तर दुसरे बिमस्टेकचे अध्यक्ष या नात्याने ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी देण्यात आले होते. भारताच्या स्पटीकरणामुळे बांगलादेशचा खोटेपणा आता उघड झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande