मुंबई पोलीस आंदोलनाला परवानगी देईनात, आता मनोज जरांगे नवा डाव टाकायच्या तयारीत, न्यायदेवतेकडे धाव घेणार
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अंतरवाली सराटीहून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना अद्याप मुंबई पोलिसांनी उपोषणाची परवानगी दिलेली नाही. मुंबई पोलिसांनी मनोज जरांग
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अंतरवाली सराटीहून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना अद्याप मुंबई पोलिसांनी उपोषणाची परवानगी दिलेली नाही. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांचा आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठीच्या परवानगीचा अर्ज दोनवेळा फेटाळून लावला होता. यानंतर मनोज जरांगे यांनी तिसऱ्यांदा पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला होता. परंतु, याबाबतही मुंबई पोलिसांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. मुंबई पोलिसांची आतापर्यंतची कार्यपद्धती पाहता परवानगीचा तिसरा अर्जही फेटाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली जाऊ शकते. ते उच्च न्यायालयात याबाबत दाद मागतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनोज जरांगे यांनी यापूर्वी वारंवार न्यायदेवता आपल्या बाजूने आहे, असे सांगितले आहे.

यापूर्वी जरांगे पाटील यांच्याकडून दोन वेळा परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मागच्या आंदोलनाचे दाखले देत दोन्ही वेळा पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यास त्या सुनावनीकडे सरकार आणि पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एक विशेष बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत आंदोलनादरम्यान लागणारा पोलीस बंदोबस्त, अतिरिक्त लागणारा पोलिस बंदोबस्त, इतर साहित्यांचा आढावा घेण्यात आला.

तसेच मुंबई उच्च न्यायालयात परवानगीसाठी जरांगे पाटील गेल्यास न्यायालयाने पोलिसांकडे विचारणा केल्यास मागील आंदोलनादरम्यान झालेल्या घडामोडी,तसेच नियम अटींचे होणारे उल्लंघन आणि सणाच्या काळात आंदोलनाचा परवानगी दिल्यास होणाऱ्या परिणामांबाबत पोलिसांकडूनही मत मांडले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande