छत्रपती संभाजीनगर विभागात २९ सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ
छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन
छत्रपती संभाजीनगर विभागात २९ सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ


छत्रपती संभाजीनगर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने “पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ” या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच दिवशी ८०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यांमध्ये 114 ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार महाकुंभात दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवार, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधारक, अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, आयटीआय उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र युवक-युवतींना सहभागी होता येणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या रोजगार महाकुंभामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून मुलाखतीपूर्वी सॉफ्ट स्कील्सचे प्रशिक्षण देखील होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा व नोंदणी करिता https://rojgar.mahaswayam.gov.in/rojgar-mahakumbh या वेबसाईट द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन विद्या शितोळे, उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande