
नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय कार्यालयाची लेखी परवानगी अथवा रॉयल्टी न भरता वाळुची चोरी करताना आढळून आलेल्या अज्ञात इसमावर कारवाई करुन दोन वाहने जप्त करण्यात आली.
याबाबत तुळशीराम एकनाथ वाघेरे (रा. शिवशक्ती रो हाऊस, बाबानगर, मखमलाबाद) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १४ सप्टेंबर रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पथक पखालरोडवरील नासर्डी पुलाखाली गेले होते. त्यावेळी नासर्डी पुलाखाली एम.एच.०४ जी.एफ. ४५३७ या क्रमांकाच्या छोटा हत्ती वाहनात काही इसम नंदिनी नदीतील वाळू भरताना दिसून आले. पथक त्या इसमांपर्यंत गेले असता त्यातील काही इसम पळून गेले. पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले.
त्यातील शेख मुजम्मील अब्दुल लतीफ हा छोटा हत्ती वाहनचालक आहे. व ही गाडी जिया शेख यांची असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दुसऱ्या इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजू रामदास वारडे (रा. एकलव्यनगर, दादासा गायकवाड सभागृहाच्या बाजूर नाशिक) यांच्या मालकीच्या वाहनामध्ये १ ब्रास वाळु कोणत्याही शासकीय कार्यालयाची लेखी परवानगी अथवा रॉयल्टी न भरता वाळुची चोरी करताना आढळून आले. याप्रकरणी पोलीस पथकाने कारवाई करुन १ लाख रुपये किंमतीचे छोटा हत्ती वाहन व १ ब्रास वाळु असा १ लाख ३५ हजार ७२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI