दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर तरुणीची हत्या, चौघांना अटक
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.) । दिल्लीतील स्वरूप नगर भागात एका किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे; यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू, आरोपींनी प
संग्रहित लोगो


नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.) । दिल्लीतील स्वरूप नगर भागात एका किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे; यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू, आरोपींनी परिधान केलेले कपडे आणि एक टेम्पो देखील जप्त केला आहे.

स्वरूप नगर पोलिसांना कुशक रोडवरील 'लाल बाउंड्री'जवळ जयपाल राणा यांच्या शेताजवळील मोकळ्या जागेत 13 सप्टेंबर रोजी सकाळ एक विद्रूप झालेला मृतदेह सापडला. प्राण्यांनी मृतदेहाची नासधूस केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवणे कठीण झाले होते.गुन्हे अन्वेषण आणि फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली, महत्त्वाचे पुरावे गोळा केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला मृत व्यक्ती एक प्रौढ महिला असल्याचे मानले जात होते, परंतु पुढील तपासात ती अल्पवयीन असल्याचे समोर आले.

अतिरिक्त पोलीस उपायुक्त लोकेश वरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ आणि आसपासच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात 50 हून अधिक सीसीटीव्ही क्लिप्सच्या विश्लेषणातून घटनेच्या वेळेस एका संशयास्पद टेम्पोची हालचाल दिसून आली.पोलिसांनी सांगितले की, अंधारामुळे वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर त्यांनी टेम्पोचा मार्ग शोधण्यासाठी विविध कॅमेऱ्यांमधील फुटेजची जुळवाजुळव केली.

तसेच 15 सप्टेंबरच्या रात्री तो टेम्पो 'खड्डा कॉलनी'मध्ये उभा असलेला आढळला. चालकाची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यातून तीन अल्पवयीन मुलांसह चारही आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून घटनेत वापरलेले दोन चाकू, गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि एक टेम्पो जप्त केला. आरोपींपैकी एक जण त्या मुलीचा कथित प्रियकर होता; त्या किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांसोबत मद्यपान केले होते. मुलगी या घटनेची तक्रार करेल या भीतीने आरोपींनी तिला चाकू भोसकून तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande