मानव तस्करी प्रकरणात 9 दोषींना जन्मठेप
आरोपींमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांचा समावेश हैदराबाद, 18 सप्टेंबर (हिं.स.) । मानव तस्करी प्रकरणात हैदराबाद येथील एनआयए विशेष न्यायालयाने 8 बांगलादेशी नागरिकांसह एकूण 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 2019 मधील प्रकरणी 17 सप्टेंब
कोर्ट लोगो


आरोपींमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांचा समावेश

हैदराबाद, 18 सप्टेंबर (हिं.स.) । मानव तस्करी प्रकरणात हैदराबाद येथील एनआयए विशेष न्यायालयाने 8 बांगलादेशी नागरिकांसह एकूण 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 2019 मधील प्रकरणी 17 सप्टेंबर 2026 रोजी हा निकाल दिला.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सीमापार होणाऱ्या संघटित मानव तस्करीशी संबंधित असून 2019 मध्ये हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात बांगलादेशी महिलांची बेकायदेशीररित्या भारतात तस्करी करून त्यांना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनआयएने तपास हाती घेतला. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने 9 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषींमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.

जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने सर्व दोषींवर मिळून 1 लाख 37 हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोषींना त्याऐवजी अतिरिक्त तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.मानव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींना झालेली ही शिक्षा सीमापार संघटित गुन्हेगारीविरोधातील न्यायालयीन कारवाईतील महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande