सुरगाणा तालुक्यातील तीन गावांना भूकंपाची धक्के
सुरगाणा, 18 सप्टेंबर (हिं.स.)। - नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात तीन गावांना शुक्रवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणविले आहेत यामुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते त्यानंतर करण्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार राठोड यांनी जाऊन ग्र
Earthquake tremors felt in three


Earthquake tremors felt in three


सुरगाणा, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात तीन गावांना शुक्रवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणविले आहेत यामुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते त्यानंतर करण्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार राठोड यांनी जाऊन ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. या घटनेला जिल्हा प्रशासनाकडून पुष्टी देण्यात आलेली आहे

मागील काही दिवसापासून सातत्याने नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा हरसुल त्रंबकेश्वर आणि नाशिक तालुक्याच्या काही भागांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. सर्वसाधारण 15 दिवसांपूर्वी नाशिक शहरालाही रात्रीच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणविले होते अजूनही नाशिक जिल्ह्यामध्ये विविध भागात भूकंपाची धक्के जाणविण्याची परिस्थिती कायम आहे.

आज शुक्रवारी सायंकाळी सर्वसाधारण सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील डांगराळे, शिंदे, रोकडपाडा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली आहेत. सर्वसाधारण 3.3 रीक्टर स्केल एवढी तीव्रतेचा हा धक्का जाणवल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे यामुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते माहिती मिळाल्यानंतर तातडीने तहसीलदार राठोड यांनी या परिसरात जाऊन ग्रामस्थांना दिलासा दिला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande