बाजारात विकण्याआधीच NSE मधील SBI हिस्स्याला SBI Mutual Fund बनला गिऱ्हाईक
NSE च्या अँकर बुकमधून ६,७४६.१ कोटी रुपये उभे; ९८ अँकर गुंतवणूकदारांचा सहभाग मुंबई, १८ सप्टेंबर (हिं.स.) : NSE च्या अँकर गुंतवणूकदार वाटपात एक वेगळाच योगायोग समोर आला आहे. SBI समूह NSE मधील स्वतःचा सुमारे १ टक्का हिस्सा विकण्यास सज्ज आहे. हा हिस्सा
एनएसई


NSE च्या अँकर बुकमधून ६,७४६.१ कोटी रुपये उभे; ९८ अँकर गुंतवणूकदारांचा सहभाग

मुंबई, १८ सप्टेंबर (हिं.स.) : NSE च्या अँकर गुंतवणूकदार वाटपात एक वेगळाच योगायोग समोर आला आहे. SBI समूह NSE मधील स्वतःचा सुमारे १ टक्का हिस्सा विकण्यास सज्ज आहे. हा हिस्सा SBI बँक आणि SBI कॅपिटल मार्केट्समार्फत बाजारात विकला जाणार आहे. पण त्याआधीच त्याच समूहातील SBI Mutual Fund, SBI Life, SBI General आणि SBI Pension Fund यांनी अँकर गुंतवणूकदार म्हणून NSE च्या शेअर्समध्ये पैसे ओतले आहेत. ही गुंतवणूक ४०० कोटी रुपयांहून अधिक आहे. थोडक्यात, बाजारात विकण्याआधीच SBI च्या हिश्श्याला SBI समूहच गिऱ्हाईक बनला आहे.

NSE ने IPO पूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून ६,७४६.१ कोटी रुपये उभे केले. ही रक्कम १५० हून अधिक मानांकित गुंतवणूकदारांकडून आली. प्रति शेअर १,७८५ रुपये दराने ३,७७,९३,७३९ शेअर्सचे वाटप झाले. यात सार्वभौम गुंतवणूक निधी, जागतिक मालमत्ता व्यवस्थापक, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि पर्यायी गुंतवणूक मंच सहभागी झाले. IPO गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल आणि सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.

अँकर बुकमध्ये LIC, गव्हर्न्मेंट पेन्शन फंड ग्लोबल, मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, फिडेलिटी फंड्स, गोल्डमन सॅक्स फंड्स आणि एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड्स सहभागी झाले. एकूण ३,७७,९३,७३९ शेअर्सपैकी १,३९,७७,५२४ शेअर्स २९ देशांतर्गत म्युच्युअल फंडांच्या ९८ स्कीम्सना मिळाले.

LIC ही NSE मधील सर्वांत मोठी भागधारक आहे. तिचा हिस्सा १०.७२ टक्के आहे — विक्रीसाठी काढलेल्या एकूण हिश्श्यापेक्षाही मोठा. LIC, LIC Mutual Fund आणि LIC Pension Fund या तिघांनी मिळून अँकर बुकमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली.

या IPO मध्ये १२,६४,३६,६५० शेअर्सची विक्री ऑफर-फॉर-सेल पद्धतीने होणार आहे. विक्रेत्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, अरांडा इन्व्हेस्टमेंट्स, द न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. किंमत पट्टा १,७०० ते १,७८५ रुपये आहे. किमान ८ शेअर्सची आणि नंतर ८ च्या पटीत बोली लावता येईल. शेअर्स BSE वर सूचिबद्ध होतील.

अँकर बुकच्या तुलनेत सुमारे २० पट मागणी नोंदवली गेली — जवळपास १.२ लाख कोटी रुपये. २० हून अधिक परदेशी लाँग-ओन्ली फंड सहभागी झाले. FPI नी ४३ टक्के म्हणजे २,८८३ कोटी रुपये गुंतवले. २५ हून अधिक देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि ११ विमा-पेन्शन कंपन्यांनी मिळून ५३ टक्के म्हणजे ३,५८८ कोटी रुपये गुंतवले.

NSE च्या IPO ला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, हा इश्यू एकूण ०.४२ पट सबस्क्राइब झाला.

गुंतवणूकदार गट सबस्क्रिप्शन (पट)

एकूण (Overall) ०.४२ पट

पात्र संस्थागत गुंतवणूकदार (QIB) ०.१९ पट

बिगर-संस्थागत गुंतवणूकदार (NII) ०.७० पट

किरकोळ गुंतवणूकदार (Retail) ०.४२ पट

कर्मचारी (Employees) ०.९४ पट

यात पात्र संस्थागत गुंतवणूकदारांचा (QIB) प्रतिसाद तुलनेने कमी, ०.१९ पट राहिला, तर बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांनी (NII) ०.७० पट सहभाग नोंदवला. किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा ०.४२ पट राहिला, तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या कोट्यात सर्वाधिक ०.९४ पट प्रतिसाद मिळाला.

NSE च्या लिस्टिंगनंतर कोण होणार मालामाल? दिग्गज उद्योगपतींच्या संपत्तीत पडणार भर, कोण आहेत हे कुबेरपुत्र?

NSE च्या शेअर्समध्ये कोणाची किती गुंतवणूक - राधाकिशन दमानी ते क्रिश गोपालकृष्णन

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आता शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या तयारीत आहे. या लिस्टिंगमुळे काही बड्या उद्योगपतींच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. IPO साठी सादर केलेल्या RHP कागदपत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार, DMart चे संस्थापक राधाकिशन दमानी, Hero Enterprise चे चेअरमन सुनील कांत मुंजाल, Infosys चे सहसंस्थापक कृष् गोपालकृष्णन आणि बाजारातील दिग्गज रामदेव अग्रवाल व मोतीलाल ओसवाल यांनी NSE मध्ये आधीच मोठा हिस्सा उभारला आहे.

पहिल्याच दिवशी IPO ला संमिश्र प्रतिसाद

NSE च्या IPO ला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, हा इश्यू एकूण ०.४२ पट सबस्क्राइब झाला.

गुंतवणूकदार गट सबस्क्रिप्शन (पट)

एकूण (Overall) ०.४२ पट

पात्र संस्थागत गुंतवणूकदार (QIB) ०.१९ पट

बिगर-संस्थागत गुंतवणूकदार (NII) ०.७० पट

किरकोळ गुंतवणूकदार (Retail) ०.४२ पट

कर्मचारी (Employees) ०.९४ पट

यात पात्र संस्थागत गुंतवणूकदारांचा (QIB) प्रतिसाद तुलनेने कमी, ०.१९ पट राहिला, तर बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांनी (NII) ०.७० पट सहभाग नोंदवला. किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा ०.४२ पट राहिला, तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या कोट्यात सर्वाधिक ०.९४ पट प्रतिसाद मिळाला.

राधाकिशन दमानी — सर्वांत मोठे गुंतवणूकदार

राधाकिशन दमानी यांच्याकडे NSE चे ३.९१ कोटी शेअर्स आहेत — म्हणजेच १.५८ टक्के हिस्सा. IPO च्या १,७८५ रुपये या वरच्या किंमत पट्ट्यानुसार, दमानी यांच्या हिश्श्याचे मूल्य तब्बल ६,९७७ कोटी रुपयांच्या घरात जाते.

मुंजाल आणि गोपालकृष्णन यांचीही मोठी गुंतवणूक

सुनील कांत मुंजाल यांच्याकडे १.०२ कोटी शेअर्स आहेत, तर क्रिश गोपालकृष्णन यांच्याकडे ९४.२९ लाख शेअर्स आहेत. १,७८५ रुपये दराने मुंजाल यांच्या हिश्श्याचे मूल्य सुमारे १,८२१ कोटी रुपये, तर गोपालकृष्णन यांच्या हिश्श्याचे मूल्य सुमारे १,६८३ कोटी रुपये होते.

अग्रवाल-ओसवाल जोडीचाही सहभाग

बाजारातील दिग्गज रामदेव अग्रवाल आणि मोतीलाल ओसवाल यांच्याकडेही प्रत्येकी ८ लाख शेअर्स आहेत. वरच्या किंमत पट्ट्यानुसार त्यांच्या प्रत्येकाच्या हिश्श्याचे मूल्य सुमारे १४३ कोटी रुपये आहे.

थोडक्यात, NSE च्या लिस्टिंगमुळे उद्योगजगतातील या दिग्गजांच्या संपत्तीत मोठी भर पडणार आहे. मात्र पहिल्या दिवशीचा संमिश्र प्रतिसाद पाहता, पुढील दोन दिवसांत विशेषतः संस्थागत गुंतवणूकदारांकडून इश्यूला कसा प्रतिसाद मिळतो, यावर या 'कुबेरपुत्रांच्या' नफ्याचे गणित बऱ्याच अंशी अवलंबून असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande