रत्नागिरी : लाखावर गणेशमूर्तींच्या विसर्जनाला प्रारंभ
रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक गणेशमूर्तींचे आज गौरीबरोबर विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकांना सायंकाळी प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गौरीबरोबरच गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे त्यानुसार आज जिल
रत्नागिरी : लाखावर गणेशमूर्तींच्या विसर्जनाला प्रारंभ


रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक गणेशमूर्तींचे आज गौरीबरोबर विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकांना सायंकाळी प्रारंभ झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गौरीबरोबरच गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे त्यानुसार आज जिल्ह्यात एक लाख 14 हजार 751 घरगुती आणि आठ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. सायंकाळी गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. समुद्रकिनारे, नद्या, तलाव आणि विहिरींवरही मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. शहरांमध्ये नगरपालिकांनी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. निर्माल्याच्या संकलनासाठीही ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande