मध्यप्रदेश : नाल्यात कार वाहून गेल्याने 8 जणांचा मृत्यू
उज्जैन, 19 सप्टेंबर (हिं.स.) । मध्यप्रदेशच्या आगर-मालवा जिल्ह्यातील नलखेडा येथील प्रसिद्ध श्री मां बगलामुखी मंदिराजवळ काल रात्री मुसळधार पावसादरम्यान भीषण दुर्घटना घडली. पावसाच्या जोरदार प्रवाहात एक कार नाल्यात वाहून गेल्याने कारमधील 8 जणांचा मृत्य
मध्यप्रदेशच्या आगर-मालवा जिल्ह्यातील नलखेडा येथील अपघाताचे छायाचित्र


उज्जैन, 19 सप्टेंबर (हिं.स.) । मध्यप्रदेशच्या आगर-मालवा जिल्ह्यातील नलखेडा येथील प्रसिद्ध श्री मां बगलामुखी मंदिराजवळ काल रात्री मुसळधार पावसादरम्यान भीषण दुर्घटना घडली. पावसाच्या जोरदार प्रवाहात एक कार नाल्यात वाहून गेल्याने कारमधील 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 3 मुले, 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नलखेडा परिसरात काल रात्री जोरदार पाऊस सुरू होता. याचदरम्यान मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार नाल्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहाच्या तडाख्यात सापडली आणि काही क्षणांतच ती वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली कार तसेच त्यातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी कार आणि मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्याची कारवाई केली.घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवत पोलिसांनी बचावकार्याची धुरा सांभाळली. दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

अपघातग्रस्त भाविक आगर-माळवा जिल्ह्यातील नलखेडा येथील प्रसिद्ध मां बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी आले होते. लखुंदर नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.दरम्यान, नलखेडा परिसरात गेल्या 24 तासांत सुमारे 3.7 इंच पावसाची नोंद झाली असून, रात्रीच्या वेळी पावसाचा जोर सर्वाधिक होता. मुख्य मार्गावरून मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना एका पुलावरून जावे लागते. या पुलाच्या अगदी खाली पावसाळा नाला वाहतो.मुसळधार पावसामुळे या नाल्यातील पाण्याचा प्रवाह अचानक अत्यंत वेगवान झाला. त्याच वेळी कार या प्रवाहाच्या तडाख्यात सापडून नाल्यात वाहून गेल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande