
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रपती सचिवालयानुसार, तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्या २२ सप्टेंबर रोजी केवडिया येथील एकता नगरमध्ये ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करतील. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यांच्या ७५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. याच दिवशी त्या ब्रह्माकुमारीजच्या ‘विश्व नव निर्माण हेतु आध्यात्मिक जागरण’ या अभियानाची सुरुवात करतील आणि वडोदरा येथे ‘ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेस’ रिट्रीट सेंटरचे उद्घाटन करतील. या प्रसंगी राष्ट्रपती ब्रह्माकुमारीज नडियादच्या ‘विकसित भारतासाठी युवा : राष्ट्रनिर्माणासाठी आंतरिक शक्तीचे जागरण’ या अभियानाचीही आभासी पद्धतीने सुरुवात करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule