
जळगाव, 24 सप्टेंबर (हिं.स.)गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असताना आज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील सुवर्णबाजारात सोन्याच्या दरात तब्बल १ हजार रुपये, तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची घट झाली. या घसरणीनंतर सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५५ हजार ५३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दरांनंतर झालेल्या या घसरणीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख ३९ हजार ९९० रुपये प्रति किलो झाला आहे.सोन्या-चांदीच्या दरात एकाच दिवसात झालेल्या घसरणीमुळे लग्नसराई, सणासुदी किंवा गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातू खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठ्यानुसार सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर