अमरावती - वनविभागात नोकरीचे आमिष, दोघांवर गुन्हा दाखल
- बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक अमरावती, 25 सप्टेंबर (हिं.स.)। वनविभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे व माहितीच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोदानगर येथ
अमरावती - वनविभागात नोकरीचे आमिष, दोघांवर गुन्हा दाखल


- बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक

अमरावती, 25 सप्टेंबर (हिं.स.)।

वनविभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे व माहितीच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशोदानगर येथील एक महिला सतीश नामक आणखी एक इसम, यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तसेच ओम विलासराव कुरमस्तकर (२२) रा. संजयगांधी नगर, असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. मैत्रिणीच्या माध्यमातून ओम व आरोपींची ओळख झाली होती. आरोपींनी वनविभागामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वनरक्षक पदाच्या भरतीसंदर्भातील जाहिरात तसेच कथित कागदपत्रे दाखवून ओमचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्यात व्यवहारही ठरला. त्यापैकी ओम व रिना तायडे यांनी आरोपीस प्रत्येकी पाच हजार रूपयांप्रमाणे एकूण १० हजारांची रक्कम दिली; मात्र काही दिवस उलटूनही नोकरीबाबत कोणतीच शाश्वती दिसत नसल्याने व ऑफर लेटरही प्राप्त न झाल्याने ओमने आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपींकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. काही दिवसांनतर आरोपींनी ऑफर लेटर दिले; परंतु ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून आपली फसवणूक केली, अशी तक्रार ओमने दिली. आरोपींनी इतर बेरोजगार उमेदवारांनाही वनविभागामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande