रत्नागिरी : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा
रत्नागिरी, 27 सप्टेंबर (हिं.स.) । आडिवरे (ता. राजापूर) येथील श्री महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त यंदा राज्यस्तरीय सोलो आणि ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही स्पर्धा श्री महाकाली मंदिरात होणार
रत्नागिरी : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा


रत्नागिरी, 27 सप्टेंबर (हिं.स.) । आडिवरे (ता. राजापूर) येथील श्री महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त यंदा राज्यस्तरीय सोलो आणि ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही स्पर्धा श्री महाकाली मंदिरात होणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलो तसेच ग्रुप अशा दोन स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा होणार असून, सहभागी कलाकारांना आपल्या नृत्यकौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, ९ हजार आणि ७ हजार रुपयांची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेत अनुक्रमे ११ हजार, ६ हजार आणि ४ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ग्रुप गटाचे प्रवेश शुल्क २ हजार रुपये, तर सोलो गटाचे प्रवेश शुल्क १ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी हेमंत सकपाळ (७७०९७३१९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande