भारतीय संस्कृती आणि प्राचीन विज्ञानाच्या आधारेच भारत बनेल 'विश्वगुरू' : राज्यपाल आचार्य देवव्रत
मीरा रोड, 27 सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने 'प्रोजेक्ट विज्ञान दर्शन' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडला.

राज्यपाल आचार्य देवव्रत

 


व्यासपीठ 
 

स्वागत 
 
मीरा रोड, 27 सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने 'प्रोजेक्ट विज्ञान दर्शन' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडला.
'विज्ञान दर्शन रिसर्च ऑर्गनायझेशन' (VDRO) तर्फे मुंबईतील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात आयोजित 'वैदिक भारत युथ थिंकर्स डायलॉग २०२६' या राष्ट्रीय परिषदेत ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला आयआयटी बॉम्बेचे संशोधक, इस्रोचे माजी संचालक डॉ. चंद्रकांत रविकांती, व्हीडीआरओचे संचालक मोहित गोर यांसह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि तरुण विचारवंत उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, "भारत हा प्राचीन काळापासूनच विज्ञानाचा आणि ज्ञानाचा देश राहिला आहे. आपले वेद, उपनिषदे आणि ऋषीमुनींचे संशोधन हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्या काळात विकसित झालेले उच्च दर्जाचे विज्ञान होते. 'प्रोजेक्ट विज्ञान दर्शन' हा उपक्रम आपल्या समृद्ध वारशाची आधुनिक विज्ञानाशी गट्टी घडवून आणणारा एक क्रांतिकारी टप्पा आहे. आजच्या तरुण संशोधकांनी भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आणि आयुर्वेद यांमधील पूर्वजांचे कार्य तार्किक दृष्टिकोनातून अभ्यासणे ही काळाची गरज आहे."
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विज्ञान केवळ यंत्रांपर्यंत सीमित न राहता मानवी कल्याण आणि निसर्ग रक्षणासाठी वापरले जावे. निसर्गाच्या नियमांनुसार जगल्यास शाश्वत विकास साध्य होतो, हाच वैदिक विज्ञानाचा गाभा आहे. आयआयटी बॉम्बे आणि व्हीडीआरओचा हा उपक्रम तरुणांना प्राचीन भारतीय विज्ञानावर शास्त्रीय पद्धतीने संशोधन करण्याची संधी देईल, ज्यातून भारताचे 'विश्वगुरू' बनण्याचे स्वप्न साकार होईल.
या वेळी बोलताना युवा संशोधक आणि व्हीडीआरओचे संचालक मोहित गोर यांनी क्वांटम फिजिक्स आणि वेदांमधील संबंध स्पष्ट करत, तरुण पिढीने अंधश्रद्धेपासून दूर राहून वैज्ञानिक व तर्कशुद्ध विचारांनी सनातन धर्म समजून घेण्याचे आवाहन केले.
 
 

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande