
* 'वन वेडिंग, मेनी स्टोरीज'चे अनावरण
मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.) - तनिष्कच्या वेडिंग ज्वेलरी सब-ब्रँड ‘रिवाह बाय तनिष्क’ने ‘वेडिंग सिग्नेचर्स’ हे खास कलेक्शन सादर केले आहे. भारतातील सहा विविध समुदायांच्या वधूंसाठी दागिन्यांचा संपूर्ण संग्रह या कलेक्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. आधुनिक भारतीय वधूला आपल्या पारंपरिक मुळांशी जोडलेले राहतानाच स्वतःची स्वतंत्र ओळख जपता यावी, या विचारातून हे कलेक्शन साकारण्यात आले आहे.
लग्नाच्या तयारीचा ८ ते १२ महिन्यांचा प्रवास हा आजच्या वधूसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा असतो. लग्नाचे डेस्टिनेशन, स्थळ, विविध समारंभ, फॅशन, फोटोग्राफी, सजावट, सौंदर्य आणि दागिने अशा प्रत्येक बाबीची निवड वधू स्वतः करते. या सर्व निवडींतून तिच्या स्वप्नातील लग्नाला एक वेगळे आणि खास रूप मिळते. ‘वेडिंग सिग्नेचर्स’च्या माध्यमातून लग्नातील प्रत्येक विधी आणि सोहळ्यासाठी दागिन्यांचा संपूर्ण वॉर्डरोब सादर करण्यात आला आहे.
‘वन वेडिंग, मेनी स्टोरीज’ या अभियानाच्या माध्यमातून डेस्टिनेशन, फोटोग्राफी आणि फिल्म यांचा सुंदर मेळ साधत संपूर्ण वेडिंग इकोसिस्टमचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध वेडिंग फोटोग्राफर जोसेफ राधिक यांनी जयपूरमधील प्रतिष्ठित ताज जय महल पॅलेस येथे निवडक वधूंचे आकर्षक लूक आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. दक्षिण भारतीय बाजारपेठेसाठी लोकप्रिय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन रिवाहच्या या अभियानाचा चेहरा बनल्या आहेत.
या अभियानातून दागिने, लग्नाचे वातावरण, परिसर आणि वधूंच्या विविध कहाण्या यांची सुरेख सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे ‘वेडिंग सिग्नेचर्स’ कलेक्शनभोवती विवाह सोहळ्याच्या उत्साहाचे आणि वैविध्याचे मनोहारी चित्र उभे राहते.
तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, “रिवाहमध्ये आमचा विश्वास आहे की, प्रत्येक वधू आपल्या लग्नाला अनोखे आणि खास रूप देते. आजच्या वधू लग्नातील प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेत आहेत. डेस्टिनेशन आणि विविध समारंभांपासून फॅशन, फोटोग्राफी आणि दागिन्यांपर्यंत प्रत्येक निवड त्यांच्या स्वप्नातील लग्नाला साकारण्यास हातभार लावते. ब्रायडल ज्वेलरीकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आम्हाला या कलेक्शनमधून दाखवायचे होते.”
“‘वेडिंग सिग्नेचर्स’अंतर्गत सात वेगवेगळ्या भारतीय वधूंच्या लूकसाठी दागिन्यांचा संपूर्ण वॉर्डरोब सादर करण्यात आला आहे. लग्नाच्या प्रवासातील प्रत्येक विधी आणि प्रसंगानुरूप आभूषणे डिझाइन करण्यात आली आहेत. ‘वन वेडिंग, मेनी स्टोरीज’ या अभियानाच्या माध्यमातून आम्ही या कलेक्शनला डेस्टिनेशन, फोटोग्राफी आणि फिल्मच्या व्यापक अनुभवाशी जोडत आहोत. वधूची पसंती केंद्रस्थानी ठेवून तिच्या विवाहसोहळ्याचा आनंद आणि उत्सव अधिक खास बनवणे हा यामागील उद्देश आहे,” असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी