कच्च्या तेलाच्या दरवाढीने बाजार कोसळला; सेन्सेक्स १,१२४ अंकांनी घसरला
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात झालेली जोरदार वाढ, पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्याने निर्माण झालेला तणाव आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण वि
Stock Market Closing


नवी दिल्ली, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात झालेली जोरदार वाढ, पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्याने निर्माण झालेला तणाव आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

सेन्सेक्स तब्बल १,१७९ अंकांपर्यंत घसरला, तर निफ्टीमध्येही ३७८ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीमुळे सेन्सेक्स ७३ हजारांच्या खाली, तर निफ्टी २३ हजारांच्या खाली जाऊन २२,८०० अंकांपेक्षाही खाली पोहोचला. बाजारातील मोठ्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल ८.७७ लाख कोटी रुपयांची घट झाली.

सोमवारी बाजाराची सुरुवातच कमजोरीने झाली. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच सर्वच प्रमुख क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव वाढला. दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला काही काळ गुंतवणूकदारांनी खरेदीचा प्रयत्न केला. मात्र, विक्रीचा दबाव अधिक असल्याने ही तेजी टिकू शकली नाही. अखेर सेन्सेक्स १.५२ टक्के, तर निफ्टी १.५६ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्स १६०.९१ अंकांच्या घसरणीसह ७३,७३४.८३ अंकांवर खुला झाला. त्यानंतर विक्रीचा जोर वाढल्याने तो १,१७९.५१ अंकांनी घसरून ७२,७१६.२३ अंकांवर पोहोचला. अखेरच्या अर्ध्या तासात झालेल्या किरकोळ खरेदीमुळे सेन्सेक्सने काहीशी सुधारणा नोंदवत १,१२४.०२ अंकांच्या घसरणीसह ७२,७७१.७२ अंकांवर व्यवहाराचा शेवट केला.

निफ्टीची सुरुवात ७५.६० अंकांच्या घसरणीसह २३,०६४.९० अंकांवर झाली. सुरुवातीला किरकोळ खरेदीमुळे तो २३,०८०.२५ अंकांपर्यंत पोहोचला. मात्र त्यानंतर जोरदार विक्रीमुळे निफ्टी ३७८.३० अंकांनी घसरून २२,७६२.२० अंकांवर आला. अखेर तो ३६०.२५ अंकांच्या घसरणीसह २२,७८०.२५ अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँकिंग, भांडवली वस्तू, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, तेल व वायू, धातू, वाहन आणि एफएमसीजी क्षेत्राला मोठा फटका बसला. निफ्टी बँक निर्देशांक १.९९ टक्के, कॅपिटल गुड्स २ टक्के, पीएसयू १.९१ टक्के, ऑईल अँड गॅस १.७७ टक्के, मेटल १.६५ टक्के, ऑटो १.६४ टक्के आणि एफएमसीजी निर्देशांक १.५३ टक्क्यांनी घसरला. मिडकॅप निर्देशांक १.६३ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांक १.८५ टक्क्यांनी घसरला.

या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४८३.२५ लाख कोटी रुपयांवरून कमी होऊन ४७४.४८ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात ८.७७ लाख कोटी रुपयांची घट झाली.

दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ४,७१७ समभागांपैकी १,३५९ समभाग वाढीसह, तर ३,१०६ समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ एका समभागाने तेजी नोंदवली. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजचा समभाग १.६७ टक्के आणि इन्फोसिसचा समभाग ०.३० टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे टीएमपीव्ही, अदानी एंटरप्रायझेस, जिओ फायनान्शियल, लार्सन अँड टुब्रो आणि अदानी पोर्ट्सच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande