गायक जुबिन नौटियाल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांच्या घरी आनंदाचे आगमन झाले आहे. १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर जुबिन आणि त्यांच्या पत्नीच्या घरी एका मुलाचा त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. एका अलीकडील संभाषणादरम्
जुबिन नौटियाल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; गायक झाले बाबा


मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांच्या घरी आनंदाचे आगमन झाले आहे. १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर जुबिन आणि त्यांच्या पत्नीच्या घरी एका मुलाचा त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला.

एका अलीकडील संभाषणादरम्यान गायकाने स्वतः ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी सांगितले की, बाळ आणि आई दोघेही सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले आहे. जुबिन बाबा झाल्याची बातमी समजताच, सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.

या प्रसंगाबद्दल बोलताना जुबिन यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचा जन्म गणेश चतुर्थीला झाला. आई आणि बाळ दोघेही उत्तम स्थितीत असून, कुटुंब या नवीन प्रवासातील सुंदर क्षण अनुभवत आहे. बाळाच्या नावाबाबत विचारले असता, गायकाने सांगितले की त्यांनी अद्याप नाव ठरवलेले नाही आणि सध्या ते बाळासोबत वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

जुबिन यांनी गेल्या एप्रिलमध्ये उत्तराखंडमध्ये अत्यंत खाजगी समारंभात आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी विवाह केला होता. गायकाने लग्नाची जाहीर वाच्यता केली नव्हती किंवा कार्यक्रमाचे कोणतेही फोटो शेअर केले नव्हते; लग्नाची बातमी नंतर समोर आली. जुबिन यांनी हा खास सोहळा अत्यंत खाजगी ठेवला होता आणि बॉलीवूडमधील सहकाऱ्यांसाठी कोणतेही रिसेप्शन आयोजित केले नव्हते, असे वृत्त होते. आता, मुलाच्या जन्मामुळे जुबिन आणि त्यांच्या पत्नीच्या आयुष्यात आनंदाची नवी लाट आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande