वीर पहाडियाच्या भावूक अंदाजाची झलक; ‘प्रेम कीटाणू’मधील ‘तुझसे बिछड के’ गाणं प्रदर्शित
मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.) : अभिनेता वीर पहाडियाच्या आगामी ''प्रेम कीटाणू'' या चित्रपटातील ''तुझसे बिछड के'' हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. वीर पहाडिया आणि आफिया सय्यद यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे प्रेम, विरह आणि तुटलेल्या नात्यातील व
मुंबई


मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.) : अभिनेता वीर पहाडियाच्या आगामी 'प्रेम कीटाणू' या चित्रपटातील 'तुझसे बिछड के' हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. वीर पहाडिया आणि आफिया सय्यद यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे प्रेम, विरह आणि तुटलेल्या नात्यातील वेदना प्रभावीपणे मांडते. या चित्रपटात वीर यापूर्वी रोमँटिक आणि आनंदी स्वभावाच्या भूमिकेत दिसला असला, तरी या गाण्यातून त्याची भावूक बाजू समोर आली आहे. त्याच्या पात्राची आंतरिक अस्वस्थता आणि नात्यात निर्माण झालेला दुरावा या गाण्यातून दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

'प्रेम कीटाणू' हा चित्रपट कॉलेज जीवनाच्या पार्श्वभूमीवर तरुण प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवर आधारित कथा सादर करतो. 'तुझसे बिछड के' हे गाणे चित्रपटाच्या कथानकाला भावनिक खोली देते; या गाण्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली होती. या गाण्याला मधुर शर्माने आवाज दिला असून, राहुल मिश्रा यांनी संगीत दिले आहे आणि मीर यांनी याचे गीतलेखन केले आहे. गाण्यातील दृश्यांतून वीर आणि आफिया यांच्यातील प्रेम तसेच त्यांच्या विरहाची तीव्र वेदना दिसून येते.

अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित 'प्रेम कीटाणू'मध्ये वीर पहाडियासोबतच आफिया सय्यद, अपारशक्ती खुराना, राकेश बेदी आणि निखिल विजय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अवनीका फिल्म्सच्या बॅनरखाली गौरव वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट विनोदी शैली, रोमान्स आणि कॉलेज जीवन यांचा मेळ घालत नातेसंबंधांमधील भावनिक पैलू उलगडतो. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande